इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली –आजी माजी दिग्गजांचा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत!
पुणे,२९ ऑक्टोबर – इंदापूर शहरातील राजकीय वर्तुळात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. हर्षवर्धन पाटील गटाचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी नगरसेवक अदिकुमार गांधी, तसेच श्री. रघुनाथराव राऊत, संजय डोनाल्ड शिंदे आणि अजिंक्य इजगुडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थाटात प्रवेश केला.

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा दुपारी २.०० वाजता पुणे वेस्ट इन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे पार पडला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे स्वतः उपस्थित राहून नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह आणि ऊर्जादायी वातावरण लाभले.
यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, आणि शिवाजी तरंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली असून, स्थानिक राजकारणात पक्षाचे वर्चस्व आणखी दृढ होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाने उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकांसाठी हा पक्षप्रवेश “गेमचेंजर” ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
