ॲड. राहुल मखरेंची राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व प्रवक्तेपदी निवड
इंदापूर(प्रतिनिधी): ॲड. राहुल मखरे यांची राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी सदस्य मंडळी मध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा प्रवक्तेपदी म्हणून निवड झाली आहे.
त्यांची निवड पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली . मुंबई येथील पक्ष कार्यालयात झाली .
यावेळी ॲड . राहूल मखरे यांनी पक्षाचे आभार मानले व दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडू
आदरणीय पवार साहेबांनी आपल्यावरील दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन. असे त्यावेळी म्हणाले. ॲड राहूल मखरे हे बहुजन संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जातात. मखरे यांचा महाराष्ट्रासह सपूर्ण भारतात जनसंपर्क दांडगा आहे. अनेक सामाजिक प्रबोधनाद्वारे समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचले आहेत. आपल्या भाषणादरम्यान ते मुद्द्यांची अचूक मांडणी करतात.
महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन ते आजपर्यंत वाटचाल करीत आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरूण त्यांच्याकडे त्यांच्या कार्याने आकर्षित झालेला दिसून येतो.
पुढे ते म्हणाले की या नविन जबाबदारीसह नव्या आव्हानांना पेलत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर इतर महत्वाचे प्रश्न हे प्रादेशिक स्तरावरून सोडवण्यासाठी भर देणार आहे. असेही ते नियुक्तीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.