हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे १६ ऑगस्टला नोकरी महोत्सवाचे आयोजन-अंकिता पाटील ठाकरे यांची माहिती 

इंदापूर : प्रतिनिधी दि.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ इंदापूर तालुका फेडरेशनच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन इंदापूर येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (दि. १६) सकाळी ९ ते सायं. ४ वा. या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर येथे दिली.

   रोजगार निर्मितीसाठी कुशल व रोजगार क्षम युवकांसाठी नोकरी महोत्सव संधी असून, युवक वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबीरे खालील ३ ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.

• भिगवण : सोमवार दि.१२ ऑगस्ट स.१० ते दु.१, स्थळ :- कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, भिगवण.

• बावडा : मंगळवार दि.१३ ऑगस्ट स.१० ते दु.१, स्थळ:-श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा

•इंदापूर : बुधवार दि.१४ ऑगस्ट स.१० ते दु.१, स्थळ :-कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर.

तरी इच्छुक युवकांनी बायोडाटा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!