ताज्या घडामोडी

इंदापूर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक ३ मध्ये भरतशेठ शहा यांचे विश्वासू सहकारी सुनील तळेकर संभाव्य उमेदवार म्हणून इच्छुक!!

इंदापूर (प्रतिनिधी) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रभागातील एकूण मतदारसंख्या २,४७९ असून त्यापैकी १,२१५ महिला आणि १,२६४ पुरुष मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा ४९ ने अधिक आहे.

या प्रभागातून विविध इच्छुक कार्यकर्त्यांनी जनसंपर्क सुरू केले असून, त्यामध्ये सुनील तुकाराम तळेकर हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत. तळेकर हे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. संघटन कौशल्य, शांत व संयमी स्वभाव आणि जनसेवेला प्राधान्य देणारी भूमिका या गुणांमुळे त्यांच्याकडे स्थानिक पातळीवर लक्ष वेधले गेले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये तळेकर हे “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या भूमिकेवर ठाम असल्याची चर्चा आहे. भरत शहा यांच्या कार्यशैलीने प्रेरित होत त्यांनी संघटनात्मक पातळीवर सातत्याने कार्य केल्याचे सांगितले जाते.

सुनील तळेकर हे भरत शेठ शहा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळेकर यांनी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडल्यामुळे आगामी निवडणुकीबाबत वातावरण आणखी उत्साही झाले आहे.

सध्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये विविध संभाव्य उमेदवारांकडून जनसंपर्क आणि संघटनात्मक तयारी सुरू असून, कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भरत शहा यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. कारण भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या गटातील संभाव्य उमेदवारांबाबतही नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!