छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बंटी सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर
इंदापूर( प्रतिनिधी):कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव व बंटी सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जेतवन बुद्धविहारा शेजारी असलेल्या माता रमाई सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बंटी सोनवणे यांनी दिली.
यावेळी ते बोलताना म्हणाले की, आपण राबिवत असलेला हा उपक्रम गरजूंना मदत करणारा उपक्रम आहे.
त्यामुळे ही एक प्रकारची छ्त्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना असेल. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना व रक्तदात्यांना स्वयं स्फुर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच रक्तदात्यांचा योग्य तो सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या सकाळी ९.३० वाजल्या पासून ते सायं ४.३० पर्यंत वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले