ताज्या घडामोडी

इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी!

धनंजय बाब्रस यांनी सांगितले की, “प्रदीप गारटकर यांनी उमेदवारीबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसला; तरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची जबाबदारी स्वीकारावी.”

इंदापूर (प्रतिनिधी):इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कार्यकर्त्यांकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर यांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले.

मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस आणि मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी सांगितले की, इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रदीप गारटकर यांचे अनुभवसंपन्न नेतृत्व उपयुक्त ठरेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. एकमुखी निर्णयाने गारटकर यांचे नाव पुढे करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदीप गारटकर हे १९९२ पासून इंदापूरच्या राजकारणात सक्रिय असून, नगरपालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी विविध उपक्रमांद्वारे योगदान दिल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

धनंजय बाब्रस यांनी सांगितले की, “प्रदीप गारटकर यांनी उमेदवारीबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसला; तरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची जबाबदारी स्वीकारावी.”

विठ्ठल ननवरे म्हणाले, “गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगर परिषदेने तीन वेळा पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता मिळवून यशस्वी कामगिरी केली आहे. शहराच्या सध्याच्या गरजा लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाची पुन्हा आवश्यकता जाणवत आहे.”

मा. नगरसेवक अनिल राऊत यांनी मत व्यक्त केले की, “१९९२ पासून गारटकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेले विकासकाम लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळावी, अशी आमची भूमिका आहे.”

प्रदीप गारटकर यांच्या निर्णयाची प्रतीक्षा

पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठ अजितदादा पवार आणि कृषीमंत्री तसेच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना या मागणीविषयी लवकरच भेटून कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्णय कळविण्यात येईल.

प्रदीप गारटकर यांनी मात्र याबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नसून, “कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवला जाईल,” असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!