कॅप्सिकल लिझर्डला सर्पमित्र पवनकुमार सूर्यवंशी यांच्याकडून जीवदान
इंदापूर प्रतिनिधी
अधिक श्रावणाच्या महिन्यात पावसाच्या रिमझिम धारात इंदापूर उमाजी नाईक नगर येथे सायंकाळी सहाच्या सुमारास कॅप्सिकल लिझर्ड जातीचा सरडा
अढळल्याने परिसरात थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु सुज्ञ नागरिकांनी वेळीच सर्पमित्र पवनकुमार सुर्यवंशी यांना फोन केल्याने या सरड्याचा प्राण वाचला.
त्यांनी पाहता क्षणीच हा कॅप्सिकल लिझर्ड असून याच्यापासून कोणताच धोका नसल्याचे सांगितले तसेच ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अश्या प्रकाराचा जीव अढळल्यास त्याला मारू नये किंवा इजा पोहचू नये तसेच त्वरित फोन करावा असे आव्हान त्यांनी नागरिकांनी केले.
पुढे ते म्हणाले की, भले हा सरडा रंग बदलणारा असला तरी त्याच्या पासून कोणताच धोका नाही. यानंतर त्यांनी हा सरडा नैसर्गिक अधिवासात सोडला. त्यामुळे परिसरात हा कुतूहलाचा विषय ठरला.