इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची रेकॉर्ड ब्रेक सभा! तिन्हीही नेते बंडखोरीच्या उंबरठ्यावर! योग्यवेळी भुमिका ठरवली जाईल! असे जनतेला सुतोवाच

इंदापूर(प्रतिनिधी):

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने याच गटातील नेत्यांनी बंडाचा निशाण हाती घेतले असून ते आक्रमक पवित्र्यात आहे.

आज इंदापूर येथील पवित्र मेळाव्यात सर्वच नेत्यांनी हर्षवर्धन पाटील चांगलेच धारेवर धरले. आणि शरदचंद्र पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय बदलावा अन्यथा आम्हाला नाईलाजाने बंडखोरी करावीच लागेल आणि अपक्ष लढावेच लागेल असा निर्वाणीचा इशारा या परिवर्तन मेळाव्यातून देण्यात आला.यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जहाल शब्दात टिकास्त्र सोडले. यावेळी जनतेला विठु माऊली संबोधत जनतेचा प्रतिसाद मिळवला.

पुढे ते म्हणाले की साहेबांनी आणि ताईंनी जर आमचे म्हणणे नाही एकले तर आम्ही बंडखोरी केल्याशिवाय राहणार नाही, आणि ही बंडखोरी भारतातील सर्वात मोठी बंडखोरी राहील असेही ते म्हणाले

यानंतर अप्पासाहेब जगदाळे हे देखील आपली आक्रमक भूमिका मांडताना दिसले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्याला वेळोवेळी कसे फसवण्यात आले.आणि यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते. आणि हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

पुढे ते म्हणाले की, एका बाजूला भाच्याने फसवले तर दुसऱ्या बाजूला मामाने फसवले. आपण अश्या आश्वासनांच्या फुग्यावरती किती दिवस राहणार ? असा सवाल त्यांनी जनतेला केला. जर पक्षाकडून हा निर्णय नाही बदलण्यात आला तर आमच्यापैकी कोणीही अपक्ष लढेल आणि इंदापूरची आपणाला साथ देईल.

यानंतर प्रवीण माने म्हणाले की, तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे. तालुक्यातील जनता आजी माजी आमदारांना कंटाळली आहे. तालुक्यात विकास काहीच झाला नाही. त्यामुळे हा परिवर्तन मेळावा घेण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यात अनेक विकास कामांचा अभाव आहे. पाणी प्रश्ना संदर्भात त्यांनी उजनी धरण आणि इंदापूर तालुक्यातील नद्यांचे पाणी कोठे जाते यावर गंभीर विचार मांडला तसेच तलाव आणि शेततळ्यांचे पाण्याचे सूनियोजन केले तर इंदापूर तालुका सुजलाम् – सुफलाम् होईल असा आशावाद त्यांनी मांडला. तसेच तालुक्यातील शैक्षणिक , धार्मिक , व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या अश्या अनेक समस्या जश्याच्या तश्याच आहेत . म्हणून या गोष्टींमध्ये बदल घडवून आणायचा आहे. आणि म्हणून हा परिवर्तन मेळावा घेण्यात आला आहे.

यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे आपल्यासाठी दैवत असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांची अनुपस्थिती या सभेत जाणवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय पाहून आपल्याला निर्णय बदलावा लागेल आणि आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी लागेल अन्यथा आम्हाला बंडखोरी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असेही ते म्हणाले.यानंतर भरतशेठ शहा म्हणाले की,परिवर्तन काय असते हे समोर बसलेल्या जनतेकडून पाहून कळते. आमच्यात कोणामध्ये भेद नाहीत. आम्ही जो दोघांमध्ये उमेदवार देऊ तोच आमचा उमेदवार असेल.सुप्रियाताई सुळे आणि पवार साहेबांनी आपला निर्णय बदलावा .आम्हाला परिवर्तन हवे आहे. दिलेल्या उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही असा इशाराही दिला

या परिवर्तन मेळाव्यात अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!