इंदापूर तालुक्याला विदर्भाची कळा!इंदापूरचे तापमान @४३ कडे!
इंदापूरचे तापमान @४३ कडे!
इंदापूर तालुक्याला विदर्भाची कळा!
इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील तापमानाने आज नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. दुपारी तीन वाजता शहरातील तापमान ४३कडे गेले आहे. यामुळे गरमाईने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
त्यामुळे नागरिकांना विदर्भातील तापमानाची आठवण झाली. अंगातून नुसत्या घामाच्या धारा वाहू लागल्याने घामाने अंघोळ केल्याचा साक्षात्कार घडला. वृद्ध नागरिकांनी छत्र्या घेतल्याने त्यांना किमान फिरता आले. पहिल्यांदाच इंदापूरच्या इतिहासात असा उन्हाळा असा असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.
नागरिकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक दुकानाकडे वळीवला असून जास्त गारवा निर्माण करणाऱ्या कूलर, ए. सी. व पंख्यांची खरेदी करताना दिसून आले. परंतु बाजारपेठेत इतरत्र मात्र शुकशुकाट दिसून आला. साहजिकच आज विद्युत पुरवठा महावितरणावर ताण पडल्याचे चित्र दिसून आले.