इंदापूर येथे एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या बेसबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या संघाची मिरवणूक -एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये खेळाडूंचा सत्कार!

इंदापूर : प्रतिनिधी दि.१६/०६/२०२५

 वनगळी-इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बंगलोर येथे शनिवारी (दि.१४) झालेल्या मेजर बेसबॉल लीग कप क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. या विजयी संघाच्या खेळाडूंचे बेंगलोर येथून इंदापूर शहरात आगमन होताच रथातून भव्य मिरवणूक सोमवारी (दि.१६) काढण्यात आली. त्यानंतर वनगळी येथे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्येही जल्लोषात रथातून मिरवणूक काढून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

      बेसबॉल हा आंतरराष्ट्रीय खेळ असून, अमेरिकेसह तो जगभर आता महत्वाचा प्रमुख खेळ समजला जात आहे. एस बी पाटीलच्या संघाने बेसबॉलच्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेव संघावर विजय प्राप्त करीत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव देशभर पोहचविले आहे. या संघामध्ये सार्थक माने, सार्थक रोकडे, अभिनव घाडगे, इंद्रनील घोगरे, रेयंश आगलावे, प्रज्वल शेटे, श्रीवर्धन ढुके, विराज भोंग, स्वराज भोंग, यशराज मारकड, रोहन देवकाते, सुशांत कोळेकर या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे. तर त्यांना क्रीडाशिक्षक साहिल बागवान, सचिन फुले, राहुल धोतरे, सौरभ बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले.

   या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षिकांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, बेंगलोरहून आगमनप्रसंगी विजयी खेळाडु व प्रशिक्षकांची सोमवारी (दि.१६) इंदापूर येथील कला विज्ञान वाणिज्य कॉलेज ते बाजार समिती प्रवेशद्वारापर्यंत रथातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.

एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये जल्लोषात रथातून मिरवणूक!

—————————————

या विजेत्या संघाची एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये सोमवारी दि.१६ रोजी रथातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सीईओ संतोष देवकर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.एस. टी. श्रीखंडे, नॅशनल स्कूलचे प्राचार्य शैलेश दरेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप बोडके यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी दूरध्वनीवरून खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

एस .बी.पाटील ग्रुप ऑफ स्कूलला दर्जेदार शिक्षणासाठी पसंती!

 

बेसबॉल च्या विजेतेपदामुळे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव आता देशपातळीवर पोहोचले आहे. वनगळी-इंदापूर येथे पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. गुणत्तेसाठी व प्लेसमेंटसाठी एस बी पाटील चे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांचे नियोजनाखाली आगामी काळात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषद बोलताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. देवकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!