किर्तीकुमार वाघमारे इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार!
इंदापूर (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीने इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू केली असून, पक्षाने किर्तीकुमार हनुमंत वाघमारे यांची इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
ही घोषणा वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी केली असून, या निर्णयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
वाघमारे यांनी सांगितले की, वंचित, गोरगरीब आणि मागास घटकांना न्याय मिळवून देणे हे आपले प्रमुख ध्येय असून, पक्षप्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात संघटन अधिक बळकट करण्याचे कार्य सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, “इंदापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्य झपाट्याने वाढत आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने पक्षाशी जोडला जात असून, परिवर्तनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.”
