महायुती सरकारचा सर्वसामान्य कुटुंबाच्या आनंदसाठी ‘आनंदाचा शिधा किट ‘ चे वाटप उपक्रम स्तुत्य – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर( प्रतिनिधी): इंदापूर शहरातील ठाकर गल्ली येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आनंदाच्या शिधा किटचे वाटप
गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने रेशन कार्डधारकांना खास भेट म्हणून शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. आज इंदापूर शहरातील ठाकर गल्ली येथील गोपीचंद गलांडे यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आनंदाच्या शिधा किटचे वाटप करण्यात आले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या किट चे राज्यभर वाटप करण्यात येत आहे.या किटमध्ये शंभर रुपयात एक किलो रवा, चणाडाळ ,साखर आणि एक लिटर खाद्यतेल आहे. राज्यातील १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधाधारकांना या योजनेचा लाभ होत आहे. महायुती सरकारचा हा उपक्रम स्तुत्य असून आर्थिक दृष्ट्या कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना देखील सण उत्सवामध्ये आनंद घेता यावा यासाठी आनंदाचा शिधा चे वाटप करण्यात येत आहे.सामान्य लोकांची अडचण लक्षात घेऊन सणाचा आनंद घेता यावा यासाठी अल्प दरात आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपयांमध्ये चार वस्तू देण्याची व्यवस्था केली आहे.तालुक्यातील हजारो लोकांना या योजनेचा लाभ होत आहे. त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. शहर व ग्रामीण भागामध्ये स्वस्त धान्य दुकानातून दरमहा देण्यात येणारा मोफत गहू व तांदूळ याबरोबरच १०० रुपयांमध्ये साखर, तेल, रवा व डाळ देऊन लोकांची सोय केल्याने सामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. सर्व लाभधारकापर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आली आहे.
या वेळी इंदापूर भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मेघश्याम पाटील,गट नेते कैलास कदम, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्नील सावंत,बबन शेटे- पाटील,अविनाश कोतमिरे,दादा पिसे, गोपीचंद गलांडे,हमिद अत्तार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!