मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेच्या निषेधार्थ इंदापूर तालुका सकल मराठा समाजाकडून राणेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
मनोज जरांगेवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इंदापूर तालुका सकल मराठा समाजाकडून राणेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
इंदापूर (प्रतिनिधी):केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक्स अकाऊंटवर मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केल्याने महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला आहे. संतापाची तीव्र लाट इंदापुरात पोहचली असून इंदापूर तालुका सकल मराठा समाजाकडून राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे.
इंदापूर शहरातून सकल मराठा समाजाकडून विशाल मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी राणे यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या.
या मोर्चाचा समारोप नगरपालिकेच्या प्रारांगणात करण्यात आला. यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात होता. विशेष करून महिला वर्गाने आपला सहभाग नोंदवला .