महात्मा फुले चौकातील लाखोंच्या फ्लेमिंगो बगळ्यांना मान दुखीचा त्रास काहींच्या माना तर मोडललेल्या तर काहींच्या वाकड्या तिकड्या!

महात्मा फुले चौकातील लाखांच्या फ्लेमिंगो बगळ्यांना मान दुखीचा त्रास काहींच्या माना तर मोडललेल्या तर काहींच्या वाकड्या तिकड्या!

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे

श्री. क्षेत्र निरा नरसिंह पुर विकास आराखड्याअंतर्गत इंदापूर शहरात चौक सुशोभीकरण करण्यात आले आहे.अनेक झालेल्या कामांपैकी महात्मा फुले चौकातील सुशोभीकरण !

या सुशोभीकरणासाठी अंदाजे  ३२ लाखांची रक्कम शासनाकडून निधीखर्च करण्यात आला आहे.

सुशोभीकरणासाठी फ्लेमिंगो बगळ्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हे फ्लेमिंगो लोखंडी पाईपवर बसविण्यात आले आहे. तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतिकृती या लोखंडी पत्र्यांपासून बसविलेल्या आहेत. १७एप्रिल २०२३ रोजी याला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

आजमितीला या सुशोभीकरणाची पुरती वाट लागलेली आहे. कारण बऱ्याच प्रतिकृती वाकलेल्या अवस्थेत आहेत. काही बगळ्यांच्या माना मोडलेल्या आहेत . तर तुटून पडण्याच्या मार्गावर आहे. जणू काही पक्षांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली की असे वाटू लागले आहे. जणू त्यांना मान दुखीचा त्रास आहे असे वाटते .

अनेक बगळ्यांचे रंग उडून गेले असून बेरंग पक्षी झाले आहेत.

अनेक एकरात वसवलेले सुशोभीकरण तळीरामांचा अड्डा बनले आहे.ठीक ठिकाणी कचरा साठलेला असून चौक कचरा केंद्र बनले आहे.

भले तार कंपाऊंड वॉल बनिवले असेल तरी तळीराम बसण्याचे सोडत नाही.या सुशोभीकरणात लावण्यात आलेली झाडे पुरती जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना पाणी नाही.येथे सुद्धा लायटिंग व्यवस्थेचा अभाव आहे. अंधारात बसलेले तळीराम दिसून येत नाही.इंदापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील हे सुशोभीकरण महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळेे राज्यात काय मेसेज जाईल देव जााणो!

बगळे कीतीचे…? असा सवाल जनतेतून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!