भावी पोलिसांनी समाजा प्रती आस्था ठेऊन गोरगरिबांची सेवा करावी – आमदार दत्तात्रय भरणे
भरणेवाडी (इंदापूर):आपल्या इंदापूर तालुक्यातील तब्बल २८ तरूण-तरूणींनी अथक प्रयत्नातून पोलिस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केले असून या सर्वांनी समाज्याची चांगल्या प्रकारे सेवा करून आई-वडिलांचे नाव उज्वल करावे,हि अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावी पोलीसांना शुभेच्छा देताना व्यक्त केली.
मागील काही दिवसांपुर्वी पोलिस भरतीचा निकाल लागला असून यामध्ये तालुक्यातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.यानिमित्ताने आज भरणेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या प्रसंगी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आपल्या तालुक्यातील शेतकरी कुटूंबातील अनेक विद्यार्थी पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कसून सराव करत होते.त्यांच्या प्रामाणिक कष्टामुळे तसेच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ख-या अर्थाने यश मिळवले आहे.त्यांच्या या यशामध्ये आई-वडिल,गुरुजन व मित्रांचा मोठा वाटा असुन भावी पोलीसांनी समाजाप्रती आस्था ठेऊन गोरगरीबांची सेवा करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.