विरोधकांच्या टिकेनंतर आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ ? कळंबच्या जनतेकडून विद्यमान आमदारांची हत्तीवरून मिरवणूक!

  • विरोधकांच्या टिकेनंतर आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ!
  • कळंबच्या जनतेकडून विद्यमान आमदारांची हत्तीवरून मिरवणूक!

इंदापूर( प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या इंदापूरच्या जाहीर सभेत बोलताना आपल्या कार्यकर्त्यांनी इतर घटक पक्षांवर टीका न करता एकमेकाशी एकोपा करण्याचे आदेश दिले.तरीसुद्धा मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सडकून टीका केली. आणित्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले. त्यांच्याकडून गुंडगिरी होत असल्याचे व आपल्याला धमकी देत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले.

यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी देखील अजित पवार गटाच्या पदाधिकऱ्यांसह सर्वाँना खडे बोल सुनावले.येणाऱ्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कसल्याही परिस्थितीत हर्षवर्धन पाटील हे निवडून येतील असा आशावाद व्यक्त त्यांनी केला.अजित पवारांचा शब्द पाळून भरणे गटाने कसलीच टीका न करता चुप्पी साधली. परंतु हर्षवर्धन पाटील हे काही केल्या गप्प न बसता आपले टीकास्त्र चालूच ठेवले. त्यामुळे आमदार भरणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा असंतोष वाढला. आणि आपल्या लाडक्या नेत्याचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने चक्क आमदारांना कळंबच्या ग्रामस्थांनी हत्तीची स्वारी घडवून आणली. कारण भरणे तब्बल १०२ कोटी रुपयांची कामे त्या गावासाठी मंजूर केले होते.लाडक्या नेत्याच्या सन्मानार्थ हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसून आले.

जनतेचे अफाट प्रेम पाहून आमदार भरणे भारावून गेले. आणि आपण ही कधीच विसरणार नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी ध्यानात राहील असे जाहीर सभेत आभार मानले.देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे हत्तीवरून मिरवणूक काढली होती.

येणारी ऑक्टोबर २०२४ निवडणूकमध्ये आमदार भरणे मोठ्या फरकाने विजयी होतील असा आशावाद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!