प्रवीण माने यांच्या प्रचाराला इंदापूरातून जोरदार सुरुवात
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूरातून तिरंगी लढत निश्चित झाली असून हा सामना प्रवीण माने, दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात रंगणार आहे.
तिघांनी आपल्या प्रचाराची सुरुवात आपल्या तालुक्यातील आराध्य दैवतांना वंदन करून केली आहे.दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील दिग्गज नेते असून प्रवीण माने हेही कोठेच कमी नाही. कारण माने यांच्याकडे युवा वर्ग मोठ्याप्रमाणावर असून तो त्यांच्याकडे झुकलेला दिसून येतो आहे.प्रवीण माने यांच्या प्रचाराची सुरुवात इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरातून व चांदशाह वली दर्गाह येथून झाली आहे.
यावेळी सोनाई परिवाराचे सदस्य कुमार माने म्हणाले की,प्रवीण मानेंची ही लढाई इंदापूरातील गोरगरीब जनतेची आहे. मोजक्या लोकांचा विकास म्हणजे विकास नव्हे तर तळागाळातील दबलेल्या लोकांना रोजगार निर्माण करून हाताला काम देवून त्यांच्यामध्ये विश्वास करणे आणि सुखी प्रपंच करणे हाच आमचा उद्देश आहे.तालुक्याला दोन नद्या असूनदेखील बऱ्याच गावात पाण्याच्या समस्या दिसून येत आहे. २२ गावाच्या पाण्याचा प्रश्न जशाच्या तसा आहे. तो ही आपण मार्गी लावू.
यानंतर पूर्ण इंदापूर शहरातून प्रचार यात्रा काढली. आणि शहरातील जनतेशी संपर्क केला.यावेळी शहरातील घर टू घर गाठी भेटी घेण्यात आल्या.लोकांना उमेदवार परिचय पत्र देण्यात आले.