शंकरराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे “ॲनिमिया मुक्त शाळा अभियानातून १०३८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न .
इंदापूर(प्रतिनिधी): शिवाजी शिंदे
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, स्वरूपवर्धिनी आणि अंजली माशेलकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया मुक्त शाळा अभियान” आयोजित करण्यात आले. हा उपक्रम स्व. शंकरराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने संपन्न झाला.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष मा.मंत्री हर्षवर्धन पाटील,शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्मा भोसले, सचिव डॉ.गिरीष देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर, विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानाअंतर्गत श्री नारायणदास रामदास हायस्कूल व महात्मा फुले विद्यालय, बीजवडी येथील १००० हून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन आणि बीएमआय चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या चाचणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकही थेंब रक्त द्यावे लागले नाही.
या तपासणी दरम्यान स्वरूपवर्धिनी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.शिरीष पटवर्धन व कार्यवाह श्री.विश्वास कुलकर्णी यांनी दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १०३८शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करून त्यांना योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली असून, भविष्यात त्यांच्या शारीरिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री.महादेव चव्हाण, संस्थेचे कार्यकर्ते श्री.भारत बोराटे व श्री हमीद आत्तार, संस्थेचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली. श्री.ना.रा.हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.संजय सोरटे , उपमुख्याध्यापिका खैरूणिसा शेख, अण्णासाहेब खटके विजयकुमार शप्पथ श्रीमती शारदा जगताप पर्यवेक्षक श्री दीपक झगडे सर, नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका फौजीया शेख, रेखा जोशी मॅडम ,तुषार उबाळे दीपक शिंदे, मुख्याध्यापिका आशा घोडके अर्चना जाडकर, स्वाती मोरे, सोनाली कासेंगावकर ,सोनाली कदम ,सौ सुप्रिया आगरखेड मॅडम महात्मा फुले विद्यालय बिजवडी चे मुख्याध्यापक श्री.विकास फलफले तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले असून, अशा उपक्रमांचे आयोजन वारंवार व्हावे, अशी मागणी होत आहे.
.