देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी दिली आपल्या प्राणाची आहुती – सौ.अंकिता पाटील ठाकरे

बावडा येथील शैक्षणिक संकुलमध्ये अंकिता पाटील ठाकरे यांचे हस्ते ध्वजारोहण

इंदापूर : प्रतिनिधी दि.१५/०८/२४

  बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलमध्ये बावडा-लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा गुरुवारी (दि.१५) उत्साही व आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण आसबे होते.

   यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या ध्वजसंचलनाची मानवंदना स्वीकारली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केला व आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना विनम्र अभिवादन करते. कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचा वृक्ष लावला, आज त्याचे कल्पवृक्षात रूपांतर झाले आहे. या शैक्षणिक संकुलामध्ये ५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे, या संदर्भात कटाक्ष असतो, त्यात ते तडजोड करीत नाहीत, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी नमूद केले.

   या कार्यक्रमास निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, सुधीर पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, स्वप्निल घोगरे, संतोष सूर्यवंशी, पवनराजे घोगरे, संजय घोगरे, प्रसाद पाटील, विठ्ठल घोगरे, राजेंद्र घोगरे, माजी सरपंच समीर मुलाणी, माजी प्राचार्य पी. एन.गोरे व के. एस. खाडे, रणजित गिरमे, सचिन सावंत, हरिभाऊ बागल, नामदेव घोगरे, उपप्राचार्य जी. जे. जगताप, पर्यवेक्षक डी. व्ही. हासे, माजी सैनिक, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. सूत्रसंचालन एस. टी. मुलाणी यांनी केले. याप्रसंगी अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते शहाजीराव पाटील कृषी तंत्रनिकेतनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

____________________________

फोटो:-बावडा येथील शैक्षणिक संकुलमध्ये अंकिता पाटील ठाकरे यांचे हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!