वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार – जिल्हाध्यक्ष राज कुमार यांची घोषणा
इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे नुकत्याच झालेल्या भव्य बैठकीत वंचित बहुजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा ठराव केला. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी स्पष्ट केले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनांनुसार वंचित बहुजन आघाडी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना एकत्र राहून पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.
या बैठकीत इंदापूर तालुक्याच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी इच्छुक सदस्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच इच्छुकांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. बैठकीला तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या तालुकास्तरीय नवीन नेतृत्वाच्या निवडीवर चर्चा करण्यात आली. या वेळी जेष्ठ मार्गदर्शक गोविंद कांबळे, ऍड. वैभव कांबळे, सतीश साळवे, संतोष कांबळे, सचिन साबळे, रेवननाथ वेताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे, किरण मिसाळ, उमेश मोरे, सोमनाथ खानेवाले, प्रीतम कांबळे, धीरज कांबळे, सुहास कांबळे, मल्हारी तिकोटे, अमीर सय्यद, दत्ता भोसले, विशाल वाघमारे, रविकांत काळे, शुद्धोधन कांबळे, विजय मोरे, रवी कांबळे, नागसेन कांबळे, दर्शन मांढरे आणि मनोज पवार यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बैठकीदरम्यान अनेक नवयुवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाच्या ताकदीत भर घातली. तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची वाढती लोकप्रियता आणि युवकांचा वाढता सहभाग लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी दमदार कामगिरी करेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी व्यक्त केला.