वंचित बहुजन युवा आघाडीची तालुका कार्यकारिणी आढावा बैठक इंदापूर येथे संपन्न
वंचित बहुजन युवा आघाडीची तालुका कार्यकारिणी आढावा बैठक इंदापूर येथे संपन्न
इंदापूर (प्रतिनिधी) : वंचित बहुजन युवा आघाडीची तालुका कार्यकारिणी आढावा बैठक इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी भूषविले.
तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या सूचनांप्रमाणे निवडणुकांचे आदेश पाळण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन तालुकाध्यक्षांनी केले.
यावेळी मालोजीराजे गढीवरील अतिक्रमण विषयावर चर्चा करताना, गरीब फकीर लोकांची घरे पाडून प्रभावशाली लोकांची अतिक्रमणे मात्र वाचवली गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सर्व अतिक्रमणे समान निकषांनुसार त्वरित पाडली नाहीत, तर वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी दिला.
बैठकीस उपाध्यक्ष उमेश मोरे, महासचिव सोमनाथ खाणेवाले, महासचिव संतोष चव्हाण, सचिव प्रीतम कांबळे, प्रसिद्ध प्रमुख धीरज कांबळे, तालुका संघटक सुहास कांबळे, विशाल वाघमारे, सदस्य अमीर सय्यद, अनिकेत मिसाळ, इंदापूर शहराध्यक्ष निलेश मखरे, महासचिव तेजस सरतापे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.