इंग्रजी माध्यमाचे तब्बल १ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळले

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून आलेला इंग्रजी माध्यमांतील शाळा प्रवेशाचा  कल यंदा बदलला आहे. चालू शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल एक हजार ९५२ विद्यार्थ्यांनी आपापल्या इंग्रजी शाळेचा निरोप घेतला आहे.

इंग्रजी शाळेच्या निरोपा नंतर हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे वळले आहेत. या सर्वांनी पुढील शिक्षणासाठी झेडपीच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.

ऐतिहासिक घोषणा 

गेल्या दशकापासून ग्रामीण भागातील पालकांचा कल ही आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करण्याकडे वाढला होता. यामुळे ग्रामीण भागातील पालक मोठ्या प्रमाणात मराठी शाळांना डावलून आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करत असत. परिणामी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घसरू लागली होती. परंतु यंदा हे चित्र बदलले असल्याचे इंग्रजी माध्यमातील शाळांमधील प्रवेश रद्द करून, झेडपीच्या शाळांत दाखल झालेल्या विद्यार्थी संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तोडीचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची पूर्वीपासूनच झेडपी शाळांकडे ओढ आहे.परंतु मध्यंतरीच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांत दाखल करण्याचा पालकांचा कल वाढला होता. ग्रामीण भागातील पालकांचा कल पुन्हा शिक्षणासाठी झेडपी शाळेत दाखल करण्याकडे वाढू लागला आहे.

 – संध्या गायकवाड                                              जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक),जिल्हा परिषद, पुणे.

झेडपी शाळांकडे वळलेले तालुकानिहाय विद्यार्थी

आंबेगाव – ४४, बारामती – १२३, भोर – ४७, दौंड – १०८, हवेली – २६४, इंदापूर – १३५, जुन्नर – ३२, खेड – ३८६, मावळ – १६७, मुळशी – १५९, पुरंदर – ११५, शिरूर -३६६ आणि वेल्हे – ६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!