आगामी महापालिका, नगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपासोबत सन्मानजनक जागा घेऊन निवडून आणणार – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.३१ मे२०२२: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री.रामदास आठवले यांची इंदापूर तालुका आर.पी.आय. च्या वतीने इंदापूर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी श्री.आठवले म्हणाले की, आगामी होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आर.पी.आय पक्ष हा भाजपसोबत राहणार आहे. तसेच या निवणुकीसाठी आर. पी.आय. सन्मानजनक जागा घेऊन आपण त्या निवडून आणणार असल्याचे सांगितले.
यावेळी साहेबांनी राज्यसभेच्या जागेवर बोलताना म्हणाले की, संभाजी महाराजांवर शिवसेनेने एकप्रकारे अन्याय केला आहे.
पुढे मनसेसोबत भाजपा युती करणार का? असा प्रश्न विचारला असता यावर ते म्हणाले की , जोपर्यंत आर.पी.आय भाजपासोबत आहे ,तोपर्यंत मनसेची भाजपसोबत युती होऊच शकत नाही.
देशातील नव्याने होणाऱ्या समान नागरी कायद्याने मागासवर्गीय लोकांवर अन्याय होईल का ?असा प्रश्न विचारला असता त्यांनी समान नागरी कायद्याने मागास वर्गीय व मुस्लिम बांधवांना कोणताच धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आर.पी.आय पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,आर.पी.आय सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, आर.पी.आय.पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार ,संदीपान बारामती लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद, संदेश सोनवणे, अमोल मिसाळ, नितीन आरडे, राजू घाडगे,नितीन झेंडे , सुनील सर्वगोड, राकेश कांबळे, नितीन झेंडे, सुनील सोनवणे, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री.संदीपान कडवळे यांनी केले.