वंचित युवा आघाडीच्या शाखेचे रेडणी येथे उद्घाटन!
इंदापूर (रेडा – रेडणी)-काल दि. ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे (जिल्हा )पूर्व मधील इंदापूर तालुक्यातील रेडणी या गावात शाखेचे उदघाट्न करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांच्या आदेशाने, पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश दादा नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे शाखा अभियान अंतर्गत प्रत्येक गावा गावात शाखा अभियान चालू आहे. त्यानुसार पुणे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले .
या शाखेची निर्मिती वंचित बहुजन व आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये भिगवण येथील युवती कार्यकर्त्या वैष्णवी कांबळे यांनी पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण मिसाळ, जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण, विनय दामोदरे, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या तालात रॅली काढून करण्यात आली त्यानंतर शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कोपरा सभेचे आयोजन करून तालुकाध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे यांनी प्रस्तावना केली. यानंतर जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी गाव तिथे शाखा अभियान राबवून प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते घडवून कार्यकर्त्यांचे प्रश्न तसेच गावातील सर्व समस्या सोडवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन शिबिरे घेऊन प्रशिक्षण देण्याचे देखील सांगितले. येणाऱ्या विधानसभे संदर्भात कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्यासाठी मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत व पक्ष वाढी संदर्भात मार्गदर्शन केले, उपाध्यक्ष किरण मिसाळ यांनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुक्यातील उपाध्यक्ष गणेश जाधव उमेश मोरे, महासचिव सोमनाथ खानेवाले, सदस्य अमीर सय्यद, सचिव प्रीतम कांबळे, संघटक सुहास कांबळे, विजय पवार, हनुमंत ठोकळे, संतोष चव्हाण आदी पदाधिकारी खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.