श्री. आर.के.शहा विद्यालयात नवं प्रवेशित विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प व शालेय साहित्य देऊन स्वागत
श्री. आर.के.शहा विद्यालयात नवं प्रवेशित विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प व शालेय साहित्य देऊन स्वागत
इंदापूर:(प्रतिनिधी)इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित,श्री.आर.के.शहा विद्यालय इंदापूर येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५/२६ करिता दिनांक १६/ ०६/२०२५ रोजी नवीन प्रवेशितांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प , पाठ्यपुस्तके व फुगे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. ॲड. गिरीश शहा यांनी स्मित हास्याने स्वागत करून त्यांची विचारपूस केली.यावेळी श्री. शहा म्हणाले की, शालेय जीवनाची सुरुवात ही नवं जीवनाची सुरुवात असते.उद्याचे त्यांचे भवितव्य शिक्षणात दडलेले असते आणि शिक्षणाशिवाय माणूस कसलीच प्रगती करू शकत नाही.
तसेच श्री. ॲड. शरद घोगरे व श्री. ॲड. रंजीत चौधरी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक ,विद्यार्थी व पालक हे उपस्थित होते.