अंकिता पाटील ठाकरे यांचा वाढदिवस इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रम घेऊन साजरा
अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात श्रमदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षरोपण
इंदापूर (प्रतिनिधी):पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे व सहकारी शिक्षक यांच्या समवेत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.