दत्तात्रेय भरणे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात लुमेवाडी येथे बाबांच्या दर्गात चादर अर्पण करून भरणेंच्या विजयाची मनोकामना
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातून विद्यामान आमदार दतात्रेय भरणे यांच्या प्रचाराचा नारळ निरा नरसिंहपूर येथून फोडून सुरुवात झाली आहे.त्यानंतर भरणे यांचा प्रचार जोरदार सुरु असून नागरिक मोठया प्रमाणावर घोंगडी बैठकांना उपस्थित राहत आहे.काही नागरिक आपल्या समस्या बोलून दाखवित आहे ; तर त्या समस्या नक्की सोडवू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिले.
तसेच त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की , विरोधकांना टिका करण्यासाठी काहीच उरले नाही. गेल्या २० वर्षात त्यांनी काय केले व किती विकास केला हे मांडण्याऐवजी आमच्यावर टिका करित आहेत. भरणेमामांनी गेल्या १० वर्षात ६००० कोटी रुपयांची कामे तालुक्यात आणून तालुक्याला सुजलाम् सुफलाम् केले. तालुक्यातील वस्तीवरील रस्ता तालुक्याच्या मुख्य ठिकाणांना जोडून तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या बांधावरील शेतमाल देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत सहज जाता येऊ लागले आहे.
पुढे ते म्हणाले की, विरोधक आता ज्या रस्त्यावरून आपला प्रचार करीत आहेत ते रस्ते मामांनीच बनिवले आहेत. कदाचित ते २० वर्षात राजकारणात मंत्री म्हणून सक्रिय असताना तालुक्यातील किती रस्त्यांचा विकास केला? किती नविन रस्ते निर्माण केले? याचे त्यांनी उत्तर द्यावे
आज त्यांच्याकडे अनेक संस्था असताना संस्थेतील कर्मचाऱ्यांचा पगार त्यांनी कधी वेळेवर केला का? तसेच शेतकऱ्यांची थकीत बिले वेळेवर देता का? असा सवालही तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी केला
ढोले म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर कारखान्याची बिले देऊन आपण कोणाचीच बिले थकवित नसल्याचा कांगावा करीत आहे त्यांना वाटत आहे की मांजर डोळे झाकून दुध पित आहे म्हणजे त्याला कोणी बघत नाही असे नसते ते सर्वांना दिसत आहे.आमदारांवर मलिदा गँग म्हणून आरोप लावत आहे. पण त्यांनी २० वर्षात त्यांनी संपत्ती गोळा केली आणि ती कुठे कुठे आहे हे आम्हाला सगळं माहित आहे. असेही ते म्हणाले.
मा. पंचायत समिती सभापती प्रशांत पाटील, मा जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले , नवनाथ रूपनवर, प्रदिप रूपनवर, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच ठीक ठिकाणी असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थिती दर्शवली. अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटातून इंदापूर तालुक्यातील सातही गटात सर्व घोंगडी सभा पार पडल्या.
तसेच इंदापूर शहरातील काही प्रभागातून सभा पार पडल्या.