प्रभाग क्रमांक १० मधून श्रीमती सुनिता प्रमोद अवघडे अनुसूचित जाती महिला जागेसाठी इच्छुक !
इंदापूर: (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक १० मधील महिला अनुसूचित जाती राखीव जागेसाठी श्रीमती सुनिता प्रमोद अवघडे यांनी उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
श्रीमती अवघडे २००८ पासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महिलांसाठी विविध सबलीकरण उपक्रम राबवले असून, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच किशोरी मुलींना आरोग्यविषयक माहिती आणि गर्भवती महिलांना आरोग्य मार्गदर्शन देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
२००५ साली जागेअभावी त्यांनी स्वतःच्या घरातून अंगणवाडी सुरू केली होती. आजही त्या ठिकाणी अंगणवाडीचे नियमित कामकाज सुरू आहे.
श्रीमती अवघडे यांच्या पुत्र अभिजीत अवघडे हे युवा उद्योजक असून, प्रभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांना भरत शेठ शहा यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते.
प्रभागातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जयंती कार्यक्रमांमध्ये श्रीमती अवघडे यांचा सहभाग कायम राहिला आहे. त्यांनी प्रभागातील महिलांशी सातत्याने संपर्क ठेवत स्थानिक पातळीवर कार्य केले आहे.
