डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ -२६ आयोजित ‘ चलो बुद्ध की ओर ‘ या अभियानाला मखरे व शिंदे दांपत्य यांचे हस्ते सुरुवात

 

इंदापूर(प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५-२६ द्वारे आयोजित करण्यात आलेल्या चलो बुद्ध की और अभियानाला विद्यमान नगरसेविका सौ.राजश्रीताई मखरे व सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक मखरे व आय कॉलेजचे प्रा.श्रीनिवास शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.सुवर्णाताई शिंदे यांच्या शुभहस्ते रविवार दि. १८ मे २०२५ रोजी स.१०.०० वा. डॉ.आंबेडकर नगर येथील जेतवन बुद्धविहारात बौद्धाचार्य प्रा.बाळासाहेब मखरे यांनी बुध्द पूजा,त्रिसरण व पंचशील पूजा घेतली.

यावेळी ॲड.राहूल रत्नाकर मखरे, शिवाजीराव वामन मखरे, संदीपान कडवळे, बंटीभाऊ सोनवणे, सुभाष खरे, महावीर गायकवाड, स्वप्नील मखरे, बापू मखरे, यशपाल सरवदे, शिवाजी, तानाजी मखरे, रोहित मखरे, खंडू मखरे, पिंटू मखरे, विजय मिसाळ, विशाल मखरे, बोधिसत्व मखरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमधील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग आणि लहान लहान मुले देखील या अभियानाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी बौद्ध धम्माचे महत्व पटवून सांगितले. बौद्ध धम्म हा जगातील सर्व श्रेष्ठ धम्म असून आपण त्याचा परिपूर्ण स्वीकार करून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार केला पाहिजे.

तसेच आपण आपल्या धम्माचा सन्मान व प्रतिष्ठा जपली पाहिजे.

कारण आज जगातील सर्व देश आप आपला धर्म जपत आहे. म्हणून आपण देखील धम्म रक्षणासाठी तत्पर असले पाहिजे.

म्हणूनच हा उपक्रम बाल संस्कार या हेतूने आयोजित करण्यात आला आहे. येणाऱ्या भावी पिढीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धममला जपण्यासाठी या अभियानाची सुरुवात केली असल्याचे प्रमुख उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

प्रा.अशोक मखरे यांनी स्तुत्य अभियान राबिवल्यामुळे महोत्सव कमिटीचे उपस्थित अध्यक्ष नवनाथ मखरे, उपाध्यक्ष किर्तीपाल वाघमारे, उपाध्यक्ष उमेश मखरे, खजिनदार अरविंद मखरे  इत्यादी पदाधिकारी व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!