इंदापूर महाविद्यालयात शांतता, इंदापूरकर वाचत आहेत उपक्रमाचे आयोजन
इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला , विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाच्या वतीने शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाच्या आधारित शांतता इंदापूरकर वाचत आहेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथाबद्दल प्रेम रुजावे, वाचन संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा , मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला पुन्हा वाचनाकडे प्रवृत्त करावे या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’ शांतता पुणेकर वाचत आहेत याप्रमाणे शांतता इंदापूरकर वाचत आहेत ही संकल्पना आपण राबवू. वाचन संस्कृती जपली पाहिजे. समृद्ध असा साहित्यिक वारसा आपल्या भारत देशाला लाभला आहे. वाचनामुळे व्यक्तीच्या जीवन जाणीवा समृद्ध होतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रज्ञा लामतुरे यांनी केले.
कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. राजेंद्र साळुंखे, कार्यालयीन प्रमुख अभिमन्यू भंडलकर , डॉ. शितल पवार , डॉ. महंमद मुलाणी, डॉ. राजकुमार शेलार, प्रा. सिद्धार्थ चितारे , प्रा. कल्पना भोसले , प्रा. सुवर्णा जाधव , प्रा. स्वाती राऊत ,प्रा.गौरी कानगुडे , प्रा.सद्दाम पटेल ,प्रा. रवींद्र साबळे प्रा. रणजीत मोरे उपस्थित होते.आभार प्रा. वीरेश होळकुंदे यांनी मानले.