रणधुमाळी : भाग २ इंदापूर विधानसभेत कोणाचे पारडे जड?२००९ ते २०१९ मधील इंदापूर विधानसभेंच्या निकालाचा इतिहास पहा एका क्लिकमध्ये!
२००९ ते २०१९ मधील इंदापूर विधानसभेंच्या निकालाचा इतिहास पहा एका क्लिकमध्ये!
इंदापूर(प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून जो तो आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आरोप प्रत्यारोप एकमेकांवर केली जात आहे. जो तो इंदापूर विधानसभेत आपले वर्चस्व दाखवत आहे. आणि मतदार राजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करीत आहे .
२००९ च्या विधानसभेचा निकालाचा विचार करता एकुण १४ उमेदवार रिंगणात उमेदवार उभे होते.
२००९ मध्ये, इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ४८ हजार ९२९ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १ लाख ९० हजार ६८५ होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पाटील हर्षवर्धन शहाजीराव या जागेवरून विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण ९२ हजार ७२९ मते मिळाली. अपक्ष उमेदवार दत्तात्रय विठोबा भरणे एकूण ८४हजार ७६९ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा ७ हजार ९६० मतांनी पराभव झाला.हर्षवर्धन पाटील यांच्या मताची टक्केवारी ४८.६३% होती तर भरणे यांच्या मताची टक्केवारी ४४.४५% होती.२००९ मध्ये इतर उमेदवार १२ इतके होते.
२०१४ मध्ये तर तब्बल २२ उमेदवार होते. मध्ये, इंदापूर विधानसभा २०१४ मतदारसंघात एकूण २ लाख ७६ हजार ९११ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या २ लाख १८ हजार ०३१ होती.
२०१४ च्या विधानसभेचा विचार केला असता विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे हे मोठ्या मताच्या फरकाने म्हणजे १४ हजार १७३ मताने जिंकून आले होते .व त्यांचे प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील तर पराभूत झाले होते. १ लाख ८ हजार ४०० मते दत्तात्रेय भरणे यांना मिळाली तर त्यांच्या मताची टक्केवारी ४९.७२%इतकी होती.तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना ९४ हजार २२७इतकी मते मिळाली.तर त्यांच्या मताची टक्केवारी ४३.२२% इतकी होती.
यावेळी भाजपचे उमेदवार माऊली चवरे यांना ४ हजार २६० मते मिळाली होती तर त्यांच्या मताची टक्केवारी १.९५% इतकी होती.
त्यांच्या नंतर विशाल बोंद्रे यांना २ हजार १८४ मते (एसएचस) पक्षाकडून प्राप्त झाली होती. ती मते १% इतकी होती.
व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुनील झेंडे यांनी १ हजार २४२ मते मिळाली होती.त्याची टक्केवारी ०.५७% इतकी होती.
यावेळी देखील इतर उमेदवारांची संख्या तब्बल २० होती.
आता आपण गतवर्षीच्या निवडणुकीचा विचार केला असता म्हणजेच २०१९ च्या लढाईचा! तर या लढाईमध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचा पराजय झालं होता परंतु तो फार थोड्या मताने म्हणजे ३ हजार ११० मतांनी!
त्यामुळे दत्तात्रेय भरणे यांना देखील याची धास्ती घेतली होती . म्हणूनच आपण अपराजित राहावे यासाठी भरणे यांनी मागील १० वर्षापासून इंदापूर तालुक्यासाठी ६ हजार कोटीची विकास कामे आणली आहेत.
२०१९ निवडणुकीचा विचार केला असता
२०१९ मध्ये एकूण मतदार संख्या ३ लाख ०५ हजार ८६६ इतके मतदार होते.
यापैकी २ लाख ३३ हजार ७५५ इतके मतदान झाले.
आणि झालेल्या मताची मतदान टक्केवारी ७६.४२% इतकी होती.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रेय भरणे यांना १ लाख १४ हजार ९६० मते मिळवून विजयी झाले.भरणे यांच्या मताची टक्केवारी ४९.२३% इतकी होती तर हर्षवर्धन पाटील यांना १ लाख ११ हजार ८५० भाजपचे उमेदवार म्हणून मते प्राप्त झाली.त्यांच्या मताची टक्केवारी ४७.९% इतकी होती.