सरडेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुप्रिया कैलास कोळेकर यांची निवड

इंदापूर प्रतिनिधी : दि. १३ मार्च रोजी ग्रामपंचायत सरडेवाडी सरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली. २०२१ रोजी निवडून आलेले सरपंच सिताराम किसन जानकर यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते.

 

त्या ठिकाणी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सुप्रिया कैलास कोळेकर व गोकुळ हनुमंत कोकरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता.

यावेळी सुप्रिया कैलास कोळेकर यांनी गोकुळ हनुमंत कोकरे यांच्याकडे (कास्ट व्हॅलिडीटी) जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याची हरकत घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शाम झोडगे यांनी २०२३ च्या जी.आर.प्रमाणे (कास्ट व्हॅलिडीटी) जात पडताळणी प्रमाणपत्र कोकरे यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांचा अर्ज अवैध करून सुप्रिया कैलास कोळेकर या निवडून आल्याचे त्यांनी जाहीर केले असल्याने सुप्रिया कैलास कोळेकर यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

 सरपंच सुप्रिया कैलास कोळेकर ह्या सरडेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आप्पा माने यांच्या त्या पत्नी आहेत.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी इंदापूर चे शाम झोडगे व सरडेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी सतीश धायगुडे यांनी कामकाज पाहिले.

बळीराम जानकर, वामन तात्या सरडे, राजाराम सागर, प्रशांत सरडे, माजी सरपंच सिताराम जानकर उपसरपंच रवींद्र शेठ सरडे व ग्रामपंचायत सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!