प्रचंड जनाधार पाहून प्रवीण माने आनंदाने ढसाढसा रडले!आजवरची रेकॉर्ड ब्रेक सभा इंदापूर तालुक्यात!
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील विधानसभेचे राजकिय वारे जोराचे वाहू लागले आहे. तालुक्यातील इंदापूरातील वाटणारी दुरंगी लढत तिरंगी होण्याची किंवा चौरंगी होण्याची शक्यता नकारता येत नाही.
प्राविण मानेंची बंडखोरी दोन्ही मात्तबरांना मोठे आव्हान ठरणार आहे.
प्रवीण माने यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने याठिकाणी तालुक्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.प्रवीण माने प्रचंड जनसमुदाय पाहून आणि कार्यकर्ते आणि जनसमुदायाने दिलेल्या घोषणांनी माने भारावून गेले आणि आनंदाने ढसाढसा रडले.
कार्यकर्त्यांना प्रवीण माने म्हणाले की, बाबीर बुवाचा गुलाल घेऊन आलोय. या गुलालाची शप्पथ घेऊन सांगतो, की तुमच्या पाठिंब्यामुळेच मी आज विधानसभेला अर्ज भरत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी दाखल केलेला अर्ज काढणार नाही’,असं म्हणत प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
पुढे ते म्हणाले की,इंदापूर तालुक्याचा १९९५ सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे, जेव्हा तिरंगी लढत होते. तेव्हा जो उमेदवार अपक्ष उभा राहतो, तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू.’
ते पुढे म्हणाले, ‘ आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे, हे लक्षात ठेवा. मी एकटा आमदार होणार नाही. आज सकाळी बाबीर बुवाला नारळ फोडून नतमस्तक झालो.
प्रवीण माने म्हणाले, ‘आजवर तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे. मला एकदा पाच वर्षे संधी देऊन बघा. तुमचा सेवक म्हणून मी काम करेल. शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचाराचा तालुका आपण निर्माण करून दाखवू.
मात्र याठिकाणी प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याने याठिकाणी तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे. ‘बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही’, म्हणत प्रवीण माने यांनी रणशिंग फुंकलं आहे.