इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित..!शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश..
गोरगरिब रुग्णांमध्ये समाधान..!
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात हजारों रुग्णांची सोनोग्राफी अभावी हेळसांड होत होती. खाजगी रुग्णालयात भरमसाठ फी आकारणी होत असल्याने सोनोग्राफी करून घेणे गोरगरीब रुग्णांना परवडत नव्हते, यामुळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सीमाताई कल्याणकर पुढाकार घेऊन सतत पाठपुरावा करून सोनोग्राफी मशीन सुरू करुन घेतली. यामुळे रुग्णांना खासगी सोनोग्राफी सेंटर मध्ये होणारा भरमसाठ खर्च आता वाचणार आहे रविवारी (दि.३)पासून ही सेवा सुरू करण्यात आली l खेड्यापाड्यातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचा खर्च वाचावा त्यांना वेळेतच सेवा मिळावी, आजारपणाचे निदान तात्काळ व्हावे, यासाठी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेवा सुरू करण्याकरिता वैद्यकीय मदत पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्हा प्रमुख सीमा कल्याणकर यांनी 19 जानेवारी 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी मंगेश चिवटे, राज्याचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत, यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन पल्ले यांची भेट घेतली व इंदापूर येथील रुग्णांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी पत्र दिले. गरोदर माता यांच्या तपासणीसाठी दोन सोनोग्राफी मोफत मिळण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ पूर्ण वेळ नाहीत. महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे इतर तालुक्यात जिल्ह्यात रुग्णांना पाठवले जात आहेत आपण खास बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा सेंटर, सोनोग्राफी मशीन ऑपरेटर, बालरोग तज्ञ, उपलब्ध करून देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली. अपघात असताना वेळेत उपचार मिळतील यासाठी विचार करावा, अशी मागणी कल्याणकर यांनी केली होती. सीमा कल्याणकर व इंदापूर वैद्यकीय मदत कक्षाचे सुरेश मिसाळ, ॲड.आनंद केकान, सागर आवटे, सोमनाथ लांडगे, राधिका जगताप आदी सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने सोनोग्राफी मशीन उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. गोरगरीब रुग्णांना हे असून ग्रुपचा निश्चित फायदा होणार आहे.रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष प्रयत्नशील राहणार आहे. अनेक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.ये
थील उपजिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांचे नियोजन होवू शकणारे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात आले आहे.मात्र अनेक वेळा वैद्यकीय साधने उपलब्ध नसल्याच्या कारणावरून रुग्णांना सेवा उपलब्ध होत नव्हती.अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची सेवा मिळताना प्राथमिक उपचार करुन त्यांना पुणे किंवा सोलापूर या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविले जात आहे.काही ब-यापैकी आर्थिक परिस्थिती असणारे रुग्णांचे नातेवाईक अकलूज, बारामती किंवा त्यांच्या सोयीनुसार इतर ठिकाणी पुढील वैद्यकीय उपचारासाठी रूग्णांना नेत होते.एवढ्या मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी सर्वसामान्य रुग्णांच्या आहेत. यावर उपाय करण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे माहिती वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.