भरत शहा यांचे मौन कोणाला ठरणार वरदान आणि कोणाला ठरणार शाप ?

इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये तीनही उमेदवार अटीतटीच्या सामन्यावर येऊन ठेपले आहेत. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची उमेदवारी दोन्ही मात्तबरांना धडकी भरवणारी आहे. सुरुवातीला या दोघांनी प्रवीण माने यांना हलक्यात घेतले.परंतु माने यांच्या प्रचारानंतर आणि वाढत्या जनाधारानंतर त्यांनी माने यांना आपल्या टीकेचे केंद्र बनिवले. त्यामुळे प्रवीण माने यांना आणखी जास्त जनाधार प्राप्त झाल्याने काटीच्या सभेत जयंत पाटील यांनी त्यांना बाळ म्हणून संबोधले. आणि त्यांचेच अनुकरण हर्षवर्धन पाटील यांनी केले. पण याच बाळाने दोघांच्या विजयाचा रथ रोखला.

त्यामुळे दोन्ही उमेदवार आप-आपले मताधिक्य वाढवण्यासाठी जिवाच्या आकांताने आणि आटोकाट प्रयत्न करत आहेत.एकमेकांनी एकमेकांवर चिखल फेक करत चांगलेच तोंड सुख घेतले. आणि एकमेकांना लोकांसमोर उघडे पाडले.याचीच परिणती म्हणून जनता संभ्रमात पडली आहे. कोणाला मतदान करावे आणि कोणाला करू नये कारण भरसभेत कोणी साखरचोर म्हणतोय तर कोणी मलिदा गँग म्हणतोय तर कोणी दुधाविषयी बोलतोय.त्यामुळे जनतेला या चाललेल्या प्रचार सभेत एकमेकांचे व्हिडिओ लावून एकमेकांची कर्मकथा ऐकवत होते

.हर्षवर्धन पाटील यांनी तर आपली सगळी शक्ती पणाला लावली होती.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची इंदापूरच्या इतिहासात दोनवेळा सभा झाली. सुप्रिया सुळे यांच्या तीन सभा आणि शर्मिला पवार यांच्या तीन सभा, श्रीनिवास पवार यांच्या दोन सभा, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या प्रत्येकी एक सभा अश्या विविध सभा घेऊन आपले शक्ती प्रदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार यांनी मात्र आपल्या विकास कामांवर विश्वास ठेऊन जनतेला मते मागितली आहेत. सुमारे ६ हजार ५०० कोटीची कामे करून मत मागत आहेत. त्यांनी केवळ आपल्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दोन सभेवर जनतेचा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु त्यांच्यावर देखील विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

 विशेष बाब म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर तालुक्यातून त्यांच्या पाटील परिवारातील मयूरसिंह पाटील , धैर्यशील पाटील, प्रशांत पाटील यांनी साथ सोडली. त्यामुळे पाटील परिवारातील वादाला सुरुवात झाली. प्रथमच पाटील परिवारातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आला तसेच अनेक रथी महारथी व दिग्गजांनी त्यांची साथ सोडली आणि परिणाम म्हणून सांगता सभेत पवार साहेबांच्या उपस्थित आपण एकटे पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

     तिसरे उमेदवार प्रवीण माने यांनी या राजकीय धगीत उडी घेतली खरी पण विशेष म्हणजे या आगीत ते टिकले आणि आपला प्रचार अतिशय जोमाने केला. त्यांनी आपल्या सभेत दोन्ही उमेदवारांवर कसलीच टीका केली नाही. त्यांनी आपल्या सभेत विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. आणि जनता हाच आपला स्टार प्रचारक म्हणून आपण जनतेचा सेवक आहोत असे स्वतःला संबोधले. त्यांच्याकडे असलेली तरुणांची फळी तालुक्यात केंद्रबिंदू ठरली. जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती असताना त्यांनी देखील अतिशय महत्वाची कामे केली.आणि याच विश्वासावर ते मते मागत आहेत.

         परंतु या विधान सभेची विशेष बाब म्हणजे इंदापूर नगराचे शेठ भरत शहा यांची स्तबद्धता!त्यांनी आपला पाठिंबा कोणालाच जाहीर केला नाही. तसेच त्यांनी बाळगलेले मौन कोणाला विजयी ठरवेल आणि आणि कोणाचा पराजय करेल हे त्यांनाच माहीत असावे. कारण त्यांच्या पाठीमागे मोठा जनाधार असून ते इंदापूर शहरासह ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय आहेत.

तिन्ही उमेदवारांनी त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला आहे. पण भरत शहा यांचा स्वभाव म्हणजे ते जितनेवाले पर बाजी लगाते है! और उसे बाजीगर बना देते है!

त्यांचा एक इशारा कोणाचे भले करणार हे मात्र उद्याच्या निकालाच्या २३ नोव्हेंबरलाच कळणार!

अश्याप्रकारे उद्याचा इंदापूरचा भावी आमदार मतपेटीत बंद होणार असून जनतेने आपले मतदान उघड्या डोळ्यांनी करावे आणि कुठल्याच भुला थापांना बळी पडू नये तूर्तास एव्हढेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!