उद्याच्या ११ऑक्टोबर २०२४ ला इंदापूरच्या जनतेला आम्ही तिसरा पर्याय देणार : प्रवीण माने

इंदापूर : येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा झालेला पक्षप्रवेश हा शरद पवारांसाठी डोकेदुःखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला शरद पवार गट राष्ट्रवादीतील इंदापूरच्या काही नेत्यांनी स्पष्ट विरोध केला असून आता इंदापूरमध्ये ज्याजागी शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्याच ठिकाणावर (शुक्रवारी दि.११ ) रोजी मेळाव्याचं आयोजन करत तालुक्यात तिसरी आघाडी तयार करुन हर्षवर्धन पाटील यांना मोठे आव्हान देणार असल्याचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इंदापूर येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात पाटील यांचा शरदचंद्र पवार गटात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

या पक्ष प्रवेशास विरोध‌ दर्शवत पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भरत शहा या शरद पवार गटाच्या प्रमुख तीन नेत्यांनी शहरातील सोनाई पॅलेस या ठिकाणी एकत्र येऊन पत्रकार परिषदेत तिसरी आघाडीची संकल्पना स्पष्ट केली.

यावेळी प्रवीण माने म्हणाले की, पक्षात मी आणि अप्पासाहेब जगदाळेंसह अनेकजण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही इच्छुक होतो. याबाबत, साहेबांना बोललो देखील होतो की, जे पक्षात आहेत अगोदर विचार करून त्यांना उमेदवारी द्या, मात्र आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे, इंदापूरकरांना तिसरी आघाडी पर्याय द्यावा अशी जनतेची कार्यकत्यांची मागणी आहे. लोकांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, त्यामुळे आम्ही जनतेच्या कोर्टात टाकणार असल्याचे सांगितले.

यानंतर अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, मीच उमेदवार म्हणून हे सगळं काय चाललं आहे? , आपल्यावर अन्याय किती असावा ? २०१४ला मला असेच आश्वासन दिले होते. २०१९ च्या विधानसभेला आम्ही निर्णय घेतला, आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला त्यांनी मला शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील यांच्या घरी बोलावून शब्द दिला आणि सांगितले होते की, २०२४ ला तुम्हीच उमेदवार म्हणून उभे रहा . माझ्यावर आणि प्रवीण मानेंवर अन्याय झाला असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

आम्ही लोकसभेला काम केलं, आज जनतेला विचारून काम करू. आज इंदापूरातील जनता म्हणते की, आजी- माजी नको तरी पण त्यांनाच बोलावून घेतात. आजपर्यंत कधी कुणाकडून आपण रुपया घेतला नाही तरी आमच्यावर असा अन्याय का? किती दिवस हा अन्याय सहन करायचा? असा सवालही अप्पासाहेब जगदाळे यांनी उपस्थित केला.

भरत शहा म्हणाले की, ताईंना सदिच्छा भेट दिली. आम्हाला वेगळा पर्याय निवडायचा होता,आणि तोच पर्याय पुढं आल्याने आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे भरत शहा यांनी म्हटले.

या आयोजित पत्रकार परिषदेत सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, विकास खिलारे यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!