आता पुढे जायचे पण मागे सरणार नाही – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून बंडाचे निशाण

बंडखोर नेते आजच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहणार की अनुपस्थित राहणार हे मात्र गुलदस्त्यात!

इंदापूर (सुरवड) : इंदापूर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून बंडाचे निशाण फडकले असून लवकरच जुन्या कार्यकर्त्यांकडून बंडखोरी केली जाऊ शकते.

याचीच प्रचिती म्हणून की काय सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांच्याकडून तालुक्यातील प्रमुख ठिकाणांहून होममिनिस्टर उपक्रम राबविला जात आहे.तसेच महिलांच्या मनाचा कानोसा घेतला जात आहे.

यावेळी पुढे जाऊ पण मागे सरणार नसल्याचे एकवाक्यता दिसून आली.

अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की,ताकाला जाऊन

गाडगं लपवण्याची गरज नाही. म्हणजेच काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या मतदानामध्ये आम्हाला सहकार्य करा आणि हात वरती करून आपली सहमती दर्शवा आणि माता भगिनी, केलेला सन्मानाची फेड मत रुपात करतील आपल्यावर विश्वास दाखवतील.

कार्यकर्त्यांनी आगे बढोच्या घोषणा दिल्यानंतर आपण पुढेच असल्याचे सांगितले. पुढे जाऊ पण मागे हटणार नाही अशी गर्जना अप्पासाहेब जगदाळे यांनी केली.

त्यानंतर प्रवीण माने म्हणाले की, येथे उपस्थित असलेल्या माता भगिनी आपल्याला निश्चित आशीर्वाद दिल्या शिवाय राहणार नाही.

वेळ आली तर जनतेच्या कोर्टात आपण चेंडू टाकू

जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल व

फक्त एकदाच संधी देऊन बघा आम्ही तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही कायम तुमच्यासोबत असू व काळ्या रात्री तुमच्या बरोबर राहू असे भावनिक आवाहन प्रवीण माने यांनी केली.

भरत शहा यांनी देखील उपस्थित महिला भगिनींना भावनिक आव्हान केले.आणि जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असेही ते म्हणाले.

यानंतर महारुद्र पाटील , दत्तात्रेय तोरसकर यांची भाषणे झाली.

सूरवड येथील झालेल्या होममीनिस्टर या कार्यक्रमा प्रसंगी हजारो महिलांनी आपली उपस्थिती व सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!