डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास पुस्तके भेट
इंदापूर( प्रतिनिधी): येत्या एप्रिल महिन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची१३३ वी जयंती साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूर शहर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीने सुरुवातीलाच चांगला उपक्रम राबविला आहे. जयंती कमिटीचे अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे यांनी व त्यांच्या टीमने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास बहुजन महापुरुषांची विचारधारा मांडणारी पुस्तके दिली आहेत.
यावेळी सोनवणे म्हणाले की, जेवढ्या चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करता येईल याचा प्रयत्न आपण करू तसेच भव्य भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. किरण लोंढे,महावीर गायकवाड सर , स्वप्नील मखरे,अमोल कांबळे, दीपक हारणे,विजय मिसाळ ,अजय मखरे, नितीन मखरे ,प्रशांत मखरे, आशिष गायकवाड, सिद्धांत खरे ,रजनीकांत लोंढे, सुमित मखरे ,दीपक चव्हाण, आदी उपस्थित होते.