चक्रव्यूह न्यूज नेटवर्क/शिवाजी शिंदे

 दि. १९ जुलै २०२२ । मुंबई । जगात वैज्ञानिकांनी शोध लावले त्यात पृथ्वीही गोल आहे हा शोध गॅलिलिओने सोळाव्या शतकात लावला, त्यानंतर न्यूटनने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला परंतु हे सर्व वैज्ञानिक बुद्ध विचारधारेला मानणारे होते म्हणून या सर्व वैज्ञानिकांचे गुरू तथागत गौतम बुद्ध होते म्हणूनच विज्ञानावर आधारित धर्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म होय असे प्रतिपादन एम.डी.सरोदे गुरुजी यांनी प्रवचन मालिकेत बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये या विषयावर दुसर पुष्प गुंफताना केले.

 बौद्धजन पंचायत समिती मुंबई यांच्या अंतर्गत संस्कार समितीच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रमाची मालिका सालाबादप्रमाणे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत सायंकाळी ठीक सात ते नऊ या वेळेत सरसेनानी, इंदू मिलचे प्रणेते, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह भोईवाडा मुंबई १२ येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष मा. लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे यांनी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तर उपसभापती मा. विनोदजी मोरे साहेब यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बापू मोरे यांनी सांभाळली तर अध्यक्ष मंगेश पवार साहेब यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवर पाहुण्यांची ओळख करून दिली, दुसरे पुष्प गुंफत असता सरोदे गुरुजी पुढे म्हणाले “अनेक संतांनी आपले अभंगातून बुद्ध विचारधारा मांडली आणि त्या अभंगाचे दाखले देत त्याचप्रमाणे बहिणाबाई चौधरी ते आतापर्यंतच्या कवी-गायकांच्या गीत काव्यांचे दाखले देऊन प्रत्येक वैशिष्ट्याचे स्पष्टीकरण देत आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीने रसिकांस खिळवून ठेवले. सदर प्रसंगी कार्याध्यक्ष मा. लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे व उपकार्याध्यक्ष एच.आर. पवार, अतिरिक्त चिटणीस रवींद्र पवार, चिटणीस श्रीधर साळवी, रवींद्र शिंदे, संदेश खैरे, गटप्रमुख रामदासजी गमरे आणि इतर सर्व माननीय सदस्य, पदाधिकारी, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध समित्या, पोट समितीच्या त्यांचे अध्यक्ष, चिटणीस, सभासद, पदाधिकारी व बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सरतेशेवटी आदरणीय सभापती आनंदराज आंबेडकर साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात बौद्ध धम्माचे प्रमुख वैशिष्ट्ये या विषयावर अनेक अशी उदाहरणे देऊन विश्लेषण केले आणि शेवटी आपल्या भाषणात ते म्हणाले की “सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष असताना कोणतीही दळणवळणाची साधने उपलब्ध नसतानाही खडतर परिश्रम घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर केला सकाळी घरातून निघताना पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेला हा सूर्यपुत्र संध्याकाळी घरी येईपर्यंत त्याचे कपडे लाल झालेले असत त्यांनी घेतलेल्या याच अथक परिश्रमाने आज धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे म्हणून यापुढे धम्माचे कार्य करणाऱ्या भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती या बाबासाहेबांच्या दोन्ही संघटनांनी हातात हात घेऊन धम्माचे काम केल्यास बौद्ध धम्म हा गतिमान, गतीशील आणि कृतीशील होईल या दुमत नाही” असे वक्तव्य आपल्या भाषणात नमूद केले, सर्वात शेवटी संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बापू मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत शेवटच्या गाथेने कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!