नगरपालिका निवडणुका २२ जूनला होण्याच्या शक्यता?आयोगाचे संकेत
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२८ मुंबई : राज्यातील बहुतेक महानगरपालिकांची मुदत संपल्याने अनेक ठिकाणी प्रशासन राज सुरू करण्यात आलं आहे. नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषेदा आणि ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आल्या आहे.
त्यामुळे आगामी महिन्यात या सर्व निवडणुका लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसी आरक्षण आणि इतर विविध कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत, परंतु अलिकडेच निवडणुक आयोगाने या संदर्भात सर्वोच्य न्यायालयात माहिती दिली आहे.महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. कारण याबाबत राज्य निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यावरून आता महापालिका निवडणुका १७जून, नगरपालिका निवडणुका २२ जून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडुका ११ जूलै तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या २’जुलैला होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील विविध निवडणुकांचा वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रतिज्ञापत्रावरून येत्या ४ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन आणि निवडणुक आयोग यांची मागणी मान्य करावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे.दरम्यान, मागील काही महिन्यापासून राज्यातील निवडणुकांबाबत चर्चा सुरू होत्या. ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे या सर्व निवडणुका रखडल्या असल्याने यासंबंधी राजकीय नेत्यांनी आपपली भूमिका स्पष्ट केली होती. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत राज्यातील निवडणुका होणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षांनी देखील मांडली होती.