आखिल भारतीय काँग्रेस इंदापूर अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी मोहम्मद रफी सरदार सय्यद यांची निवड

 इंदापूर (प्रतिनिधी):काँग्रेस भवन पूणे येथे पूणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पूणे जिल्हाध्यक्ष मा.आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्यांक पूणे जिल्हाध्यक्ष जमीर काझी यांच्या हस्ते मोहम्मद रफी सरदार सय्यद यांची इंदापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

    यावेळी मोहम्मद रफी सरदार सय्यद म्हणाले की,पक्षाने माझ्यावरती टाकलेला विश्वास मी सार्थक करीन.पक्षाची ध्येयधोरणे व विचार जनसामान्यापर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी व प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्याचे काम करीन असे यावेळी ते म्हणाले.

यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष संजयजी जगताप, शहराध्यक्ष चमनबाई बागवान, जिल्हा सरचिटणीस जाकीर काजी, यावेळी उपस्थित होते. निवडी बाबत माहिती इंदापूर तालुका उपाध्यक्ष निवास शेळके यांनी पत्रकारांना दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!