अंकिता पाटील ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त बोराटवाडी विद्यालयाचा शैक्षणिक दत्तक उपक्रम
अंकिता पाटील ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त बोराटवाडी विद्यालयाचा शैक्षणिक दत्तक उपक्रम
इंदापूर : प्रतिनिधी दि.२८/१२/२३
बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांचा वाढदिवस शैक्षणिक दत्तक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेल्या नऊसूत्री पैकी एक असलेल्या ‘ गरीब कुटुंबाचा आधार व्हा ‘ च्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यालयातील शिक्षकांनी गरीब, निराधार, ज्यांचे पालकत्व हरपले आहे अशा ११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन वाढदिवस साजरा केला. विद्यालयातील अनुदानित शिक्षक व कर्मचारी हे गरीब व निराधार ११ मुलांना दत्तक घेऊन या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार आहेत, अशी माहिती प्राचार्य भिमराव आवारे यांनी दिली.