जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा वृक्ष संजिवनी परिवार पतंजली योग समिती इंदापूर शाळा क्र १ व २ यांचे वतीने सन्मान!
इंदापूर(प्रतिनिधी):आज जागतिक महिला दिनानिमित्त नगरपालिकेतील कष्टकरी साफसफाई करणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या महिलांचा प्रत्यक्ष कचरा प्रकल्पावर जाऊन कष्टकरी महिलांचा सन्मान गुलाब पुष्प व मिठाई देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सत्कार केला.
अशा पद्धतीने सत्कार होताना या महिला भगीनींना गहिवरून आले व डोळ्यात आनंदाश्रु आले .वृक्ष संजिवनी परिवार पतंजली योग समिती इंदापूर शाळा क्र १ व २ यांचे वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी वृक्ष संजिवनी परिवाराच्या सायरा आत्तार तसेच पतंजली योगसमितीच्या वतीने श्री मल्हारी घाडगे यांनी उपस्थित सर्व महिलांच्या कार्याचे कौतूक करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला .
याप्रसंगी रश्मी निलाखे, स्वाती अधटराव, वर्षा पोळ , महिला कॉन्स्टेबल माधुरी लडकत ,चंद्रकांत देवकर , अशोक अनपट, देवराव मते ,हमीद. आत्तार व अशोक चिंचकर उपस्थित होते .