राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अंकिता ठाकरे – पाटील यांचाही इंदापूर विधानसभेसाठी अर्ज दाखल!
त्यांच्या या उमेदवारी दाखल अर्जाने तालुक्यात तर्क – वितर्क चर्चेला उधाण!
इंदापूर( प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाकडून मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा नुकताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गुरुपुष्यामृत दिवशी वाघ पॅलेस येथे खा. सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा देखील पार पडली. आणि हर्षवर्धन पाटील तूतारीचे उमेदवार ठरले आहेत.
परंतु आजच्या फॉर्म दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे – पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेने चर्चेला उधाण आले आहे.
तर या अर्जाला डमी अर्ज म्हणून देखील पाहिले जात आहे.