अप्पासाहेब जगदाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला पाठिंबा! भरणे यांचा प्रचार करणार!  

होऊन कोणाच्या विरोधात बोलणार नाही आणि कोणी माझ्याविरोधात बोलले तर सगळंच बाहेर काढीन – जगदाळे यांचा कोणाला इशारा?

इंदापूर (प्रतिनिधी): संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष अप्पासाहेब जगदाळे यांच्या निर्णयाकडे लागून राहिले होते.

त्यांनी मागील झालेल्या पत्रकार परिषदेत आपण सांगितले होते की, दिवाळीनंतर दि .२९ ऑक्टोबर रोजी आपण निर्णय घेणार होतो पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय पुढे ४ दिवसांनी घेऊ असे सांगितले

त्यानंतर आज ३ नोव्हेंबर रोजी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार) गटाचे इंदापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीतील त्यांच्यासोबत असलेले अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंवर विश्वासघाताचा घणाघाती आरोप लावला.पुढे ते म्हणाले की, मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण जर कोणी माझ्या विरोधात बोलले तर सगळ्च बाहेर काढीन.

२०१४ पासून आपल्यावर फार अन्याय झाला आहे. जनतेला सर्वच नेते फसवणारे आहेत त्यामुळे साधक बाधक चर्चेनंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे.

प्रवीण माने यांचा निर्णय हा एकतर्फी आहे. आणि तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला विश्वासात न घेता प्रवीण माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

खरं तरं पद्मा भोसले यांना उमेदवारी देण्याच्या विचारात होतो. परंतु अगोदर पक्ष काय निर्णय घेतो याच्यानंतर आम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले.

परंतु त्याच रात्री त्यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले.

त्यांच्या या निर्णयाने कोणावर विश्वास ठेवावा हेच समजेनासे झाले आहे.

यामुळे सगळेच नेते लबाड आहेत असेही ते म्हणाले.

म्हणून आपण जनता हीच जनार्दन मानून आणि त्यांच्या मनातील निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

काही लोकांनी अफवा देखील पसरवल्या होत्या. म्हणून घरी बसून देखील जमणार नव्हते. कारण कार्यकर्त्यांचा देखील काहीतरी निर्णय घ्या असा तगादा लावला. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे यांचा मला फोन देखील आला. परंतु आपण निर्णयाच्या भूमिकेत नव्हतो.

परंतू काही लोकांनी उमेदवारांनी साधा फोन देखील केला नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.अप्पासाहेब जगदाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले असून लवकरच मेळावा देखील घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, अंकुश जाधव, आदिक कुमार गांधी, किरण बोरा ,अरविंद वाघ, विलास माने, आबा मोहोळकर, आबासाहेब वीर, आबासाहेब फडतरे, कांतीलाल झगडे,भैय्यासाहेब जगदाळे, आबा पाटील, रामकृष्ण मोरे, माऊली निंबाळकर व कृषी बाजार समितीचे संचालक , आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!