ऊस तोडणी मजूर वर्गासाठी मोफत आरोग्य तपासणी – कर्मयोगीचा आदर्श व्रत उपक्रम
इंदापूर (प्रतिनिधी) :दिनांक २५/१२/२०२३ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर बिजवडी येथील कारखाना परिसरातील मजूर वसाहती मध्ये १०० मजुरांची आज आरोग्य तपासणी करण्यात आली. मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि श्रीमती पद्माताई भोसले यांच्या प्रेरणेनेतून ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखाना ही संकल्पना निर्माण झाली,जिथे ऊसतोड चालू आहे तेथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस तोड मजुरांची आरोग्य तपासणी केली जाते, मोफत औषध उपचार केले जातात , यातून ऊसतोड मजुरांचा वेळ आणि पैसा याची बचत होते. ऊस तोडणीला चांगलीच मदत होते, या उपक्रमासाठी कारखान्याचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक , शेतकी विभागाचे कर्मचारी वर्ग, यांची फार मोठी मदत होते, यामुळे गेली चार वर्ष झाली ही कर्मयोगीची ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी ही संकल्पना महाराष्ट्रात आदर्श व्रत ठरली.
या उपक्रमाचे उद्घाटन कर्मयोगीचे कार्यकारी संचालक श्री देवराव लोकरे साहेब कारखान्याचे ओ .एस . शरद काळे साहेब, शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे साहेब कारखान्यातील शेतकी विभागातील गुणवरे,नवनाथ व्यवहारे ,कर्मचारी वर्ग, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार,दिपक जगताप तसेच आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम ,वॉर्ड बॉय नितेश बेटेकर, नर्स दिव्या घुमरे ,दिव्या लांडे, केंद्रप्रमुख महादेव चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी पार पडली. आरोग्य तपासणीचे हे ४ थे वर्ष आहे .