प्रयत्नांची पराकाष्ठा चिकाटीने उदयाच्या २३ तारखेला इंदापूर तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही- हर्षवर्धन पाटील

इंदापूर (प्रतिनिधी): दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमा निम्मित्त हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगल्यावर इंदापूर तालुक्यातील जनतेला व कार्यकर्त्यांना सस्नेह निमंत्रण व दिपावलीच्या फराळाचे आयोजन केले होते.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना व तालुक्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच बरोबर कानमंत्र ही दिला यावेळी ते म्हणाले की,उदयाचा विजय संपादित करण्यासाठी प्रयत्नांची  पराकाष्ठा करावी लागेल. कार्यकर्ते चिकाटीने काम करीत आहे. म्हणूनच उद्याच्या २३ तारखेला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी, पवार साहेबांचे हात मजूबत व बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्वधर्म समभावाने, गुण्यागोविंदाने एकत्र आलेले काही जातीयवादी लोकांना बघवत नाही.म्हणून कुठल्याही भुल थापांना बळी न पडता उघड डोळ्याने काम करावे.

यानंतर त्यांनी सर्व जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर राम कृष्ण हारी चा नारा देऊन तुतारी वाजविण्याचे आव्हान केले.भाग्यश्री बंगल्यावर तुतारी गुंजली.हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!